पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा हल्लाबोल

January 16, 2013 10:17 AM0 commentsViews: 6

16 जानेवारी

पाकिस्तानमध्ये राजकीय संकट आणखी दाट झालंय. भ्रष्टाचाराविरोधात नागरीक रस्त्यावर उतरले आहे. धार्मिक नेते कादरी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लाहोरहून निघाललेला मोर्चा इस्लामाबादेत पोहचलाय. या मोर्चासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. संसद आणि प्रतिक विधिमंडळे बरखास्त करून सत्ताधार्‍यांनी पायउतार व्हावे अशी त्यांनी मागणी केलीय. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुप्रीम कोर्टानं पाकिस्तानच्या पंतप्रधान परवेझ अश्रफ यांच्या अटकेचे आदेश दिलेत. त्यामुळे पाकिस्तानातली राजकीय परिस्थिती अधिकच अस्थीर झालेली आहे. त्यात आता धार्मिक नेते मौलाना ताहिरूल कादरी यांना सर्वसामान्य जनतेकडून प्रतिसाद मिळतोय त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय संकट अधिकच वाढताना दिसतंय.तर दुसरीकडे कादरी यांच्या या लाँग मार्चच्या मागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचा आरोप होऊ लागलाय.

close