पुण्यात 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

January 1, 2013 1:13 PM0 commentsViews: 5

01 जानेवारी

राजधानी दिल्लीत आणि देशभरात घडणार्‍या बलात्कारांच्या घटनेन देश भरात खळबळ उडाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील हडपसर भागात एका सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कारांची धक्कादायक घटना घडलीय. पीडित मुलगी सकाळी शौचासाठी गेली असता अज्ञात आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचं पोलिसाच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. पीडित मुलीला उपचारा करिता पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कार करणार्‍यांची काही फूटेज सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. पोलीस आता या फूटेजच्या आधारावर आरोपीचा शोध घेत आहेत.

close