आता चर्चा नाहीच !

January 17, 2013 5:29 PM0 commentsViews: 2

17 जानेवारी

नियंत्रण रेषेवरच्या तणावानंतर भारतानं कडक भूमिका घेतल्यानं आता पाकिस्तान मवाळ झालंय. भारत-पाकिस्तान दरम्यान चर्चा सुरू राहायला हवी असं पाकिस्ताननं म्हटलंय. यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी केलीय. पण भारतानं मात्र हे आवाहन फेटाळून लावलंय. परराष्ट्रमंत्री स्तरावरच्या चर्चेसाठी सध्या वातावरण योग्य नसल्याचं भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय. भारतीय सैनिकांशी अमानवी कृत्य करणार्‍या सैनिकांना पाकिस्ताननं आधी शिक्षा द्यावी, अशी भारताची भूमिका आहे.

close