राज्यात मुंडेंच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढणार -खडसे

January 23, 2013 9:07 AM0 commentsViews: 3

23 जानेवारी

भाजपमधील सत्तांतरामुळे महाराष्ट्राचं राजकारण रंगलंय. महाराष्ट्रातील निवडणुका गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून जावं लागल्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, पण त्याचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही असंही खडसेंनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष नेमलेजातील तसंच नितीन गडकरींचं मार्गदर्शन घेतलं जाईल असंही खडसेंनी स्पष्ट केलंय.

close