नवं आयआयझेड धोरण संशयाच्या भोवर्‍यात

January 3, 2013 10:23 AM0 commentsViews: 16

03 जानेवारी

राज्याचं नवं औद्योगिक धोरण बुधवारी मंजूर झालं. यात सेझ (SEZ) ऐवजी सरकारनं आयआयझेड (IIZ) म्हणजेच एकात्मिक औद्यगिक झोन (INTEGRATED INDUSTRIAL ZONE) ची निर्मिती करण्याचं ठरवलंय. पण आता नव्या आयआयझेडवरून मोठा वाद निर्माण झालाय. या क्षेत्राखालील आधी सेझसाठी अधिग्रहीत केलेल्या 27 हजार हेक्टर जमिनीपैकी 60 टक्के जमिनीचा वापर उद्योगांसाठी तर 40 टक्के निवासी कारणासाठी होणार आहे. त्यामुळे या धोरणावर मंत्रिमंडळातूनच टीका झालीय. है औद्योगिक धोरण म्हणजे गृहनिर्माण धोरण असल्याची टीका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. अशाप्रकारे शेतकर्‍यांकडून घेतलेल्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प कसे उभारता येणार असा सवाल राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. बड्या उद्योजक लॉबिच्या दबावाखाली तर हे धोरण मंजूर होत नाहीना अशीही शंकाही काही मंत्र्यांनी उपस्थित केली.पण आता राष्ट्रवादी काँग्रेसनं नव्या औद्योगिक धोरणांचं स्वागत केलंय.

close