उत्तर भारतात थंडीचा कहर, 107 जणांचा बळी

January 4, 2013 1:33 PM0 commentsViews: 7

04 जानेवारी

उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. एकट्या उत्तर प्रदेशात थंडीमुळे 107 जणांचा मृत्यू झालाय. राजधानी दिल्लीत तापमान 3 अंशांच्या खाली गेलंय. दिल्लीतले रस्ते सकाळी धुक्यांनी झाकून जातात हिच परिस्थिती संध्याकाळी होती. या धुक्यांमुळे रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. गेल्या 44 वर्षातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे शहरातील सर्व सरकारी शाळा 12 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर अमृतसर, सिमला इथंही थंडीचा कडाका वाढला असून तापमान शुन्याखाली गेलंय. देशाच्या उत्तरभागात 20 किलोमीटर प्रति तास वेगाने हिमवर्षाव सुरू आहे त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्याना थंडीचा फटका बसलाय.आणखी काही दिवस तापमान कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय.

close