‘पाकिस्तानवर दबाव आणा’

January 16, 2013 10:29 AM0 commentsViews: 6

16 जानेवारी

पाकिस्ताननं युध्दविरामाचं उल्लंघन करून सीमेवर चालवलेली मुजोरी आणि दहशतवादाचा मुद्दा भारतानं युनोसमोर मांडलाय. अत्यंत कठोर शब्दात संयुक्त राष्ट्रसंघ' (युनो)पुढे भूमिका मांडताना भारतानं आंतरराष्ट्रीय समुदायाला सोईची भूमिका न घेण्याचं आवाहन केलंय. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतोय आणि त्याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायानं ठोस भूमिका घ्यावी असं आवाहनही भारतानं केलंय. मुंबईवर झालेला 26/11 चा हल्ला असो वा काश्मिर खोर्‍यात दहशतवाद्यांची घुसखोरी आणि अलीकडेच सीमारेषेवर झालेल्या दोन जवानांची निर्घृण हत्या ही कुरापतखोर पाकिस्तानचं कृत्य आहे. मात्र पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू राहावी असं मत व्यक्त केलं. तसंच भारताच्या वरिष्ठ पातळीवरुन करण्यात येणार्‍या वक्तव्यांवरही हिना रब्बांनी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कठोर भूमिका घेत आता पाकसोबत व्यवहार करणे कठीण आहे असं कडक शब्दात सुनावलं होतं.

close