दिल्ली गँगरेप :आरोपींचं वकीलपत्र घेणार्‍या वकिलांना विरोध

January 7, 2013 1:21 PM0 commentsViews: 12

07 जानेवारी

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या 5 आरोपींना आज साकेत कोर्टात हजर करण्यात आलं. पण या आरोपींचं वकीलपत्र घ्यायला मोठा विरोध होतोय. आरोपींना कोर्टात नेत असताना कोर्टाबाहेर लोकांनी घोषणाबाजी केली. आरोपींचं वकीलपत्र घ्यायचं नाही असा ठराव साकेत बार असोसिएशननं केला होता. पण एका वकिलानं वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवल्यामुळे त्यावरून दिवसभर वाद सुरू होता. या केसशी संबंधित नसलेल्या लोकांनी कोर्टाच्या बाहेर पडण्याचे आदेश दिले. आणि मग खटल्याचं कामकाज उशिरा सुरू झालं. सर्व पाचही आरोपींनी चार्जशीटच्या कॉपी देण्यात आल्या. हा खटल्याची सुनावणी इन-कॅमेरा होणार आहे. यापुढची सुनावणी 10 जानेवारीला होईल.

close