पाकिस्तानविरोधात भाजपची निदर्शनं

January 9, 2013 12:04 PM0 commentsViews: 2

09 जानेवारी

पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबार प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपनं ठिकठिकाणी पाकिस्तानविरोधात निदर्शनं सुरू केली आहेत. तर आता सरकारनं पाकिस्तानविरुद्ध ठोस भूमिका घेण्याची मागणी भाजपनं केली आहे. तर संरक्षण मंत्री ए.के.अँटोनी यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी शिवसेनेनं केली आहे. पाकिस्तानाच्या सैनिकांनी पँूछमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीकरून गोळीबार केला या गोळीबार दोन जवान शहीद झाले.

close