शिंदे दहशतवाद्यांचे लाडके :संघ

January 21, 2013 9:51 AM0 commentsViews: 7

21 जानेवारी

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतात असं खळबळजनक व्यक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा संघ आणि भाजपने शिंदेंचा कडाडून निषेध केला आहे. आता ते दहशतवाद्यांचे लाडके झाले आहेत. अशा वक्तव्यांनी ते शत्रूची मदत करतात अशा बोचर्‍या शब्दात आरएसएसचे प्रवक्ते राम माधव यांनी टीका केली आहे. तर जमात-उद-दवानं शिंदेंचं कौतुक केलंय. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफीज सईदने शिंदेंच्या व्यक्तव्यावर दिलासा व्यक्त केला. अखेर सुशीलकुमार शिंदे सत्य बोलले. आम्हाला वाटतं पाकिस्तान गेली अनेक वर्षं भारतावर दहशतवादाचे जे आरोप करतंय ते अल्लाच्या कृपेनं आता खरं ठरतंय. अशी प्रतिक्रिया सईदने टिवट्वर नोंदवलीय.

close