उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या अध्यक्षपदी निवड

January 23, 2013 10:18 AM0 commentsViews: 90

23 जानेवारी

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार देण्यात आले. उद्धव ठाकरे यांना आता सर्व पक्षाचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहे. कामकाजाचे निर्णय, नेमणुका करण्याचे अधिकार आणि कोणाला हटवण्याचे अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंकडे असणार आहे. तसंच अंतिम निर्णय त्यांचाच असेल त्याचबरोबर कार्यप्रमुख,कार्याध्यक्षपद असं कोणतही पद आता राहणार नाही अशी माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. यापुढे शिवसेनाप्रमुख पद नसेल. बाळासाहेब आणि शिवसेनाप्रमुख ही संज्ञा आहे ती बाळासाहेबांसोबत थांबली आहे. यापुढे या पदावर कोणीही बसणार नाही असंही देसाई यांनी स्पष्ट केलं. त्याचपाठोपाठ युवा सेना ही सेनेची अंगिकृत संघटना असल्याचा प्रस्तावही सेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय. या बैठकीसाठी शिवसेनेचे राज्यभरातून नेते आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे.

शिवसेनेच्या बैठकीत पाच प्रस्ताव मंजूर

1) हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व 2) 2014 मध्ये सत्ता आणणार3) महिलांच्या संरक्षणासाठी सर्वच पातळीवर काम करणार 4) भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार 5) उध्दव ठाकरेंना सर्वाधिकार

close