मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच

January 3, 2013 10:36 AM0 commentsViews: 6

03 जानेवारी

पाच दिवस झाले तरी मध्य रेल्वेची लोकलसेवा ट्रॅकवर आलेली नाही. ठाणे रेल्वे स्टेशनवरचे सगळे इंडिकेटर्स बंद असल्यानं आज सकाळपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले. सलग सहाव्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिरानं सुरू असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान गेले काही दिवस मुंबईतील मध्य रेल्वेवर जो खेळखंडोबा सुरू आहे. त्याला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलीय. आज त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेऊन ही मागणी केली. रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे आतापर्यंत चार बळी गेलेत. बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, तसंच रेल्वे लवकर पूर्वपदावर आली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

close