लष्करप्रमुखांनी घेतली शहीद हेमराज यांच्या कुटुंबीयांची भेट

January 16, 2013 10:44 AM0 commentsViews: 2

16 जानेवारी

लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी आज शहीद हेमराज सिंग यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी हेमराज यांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. प्रशासनाकडून शहीद हेमराज यांना योग्य सन्मान दिला गेला नसल्याची त्यांच्या कुटुंबीयांची तक्रार होती. त्यानंतर त्यांनी उपोषणही केलं होतं. त्यामुळे अखेर खुद्द लष्करप्रमुखांनी हेमराज यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसंच त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवण्याचंही आश्वासन दिलं.

close