जयराम रमेशांचा घरचा अहेर, स्वबळावर लढू शकत नाही

January 18, 2013 10:33 AM0 commentsViews: 4

19 जानेवारी

केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय. येत्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढू शकत नाही आणि सरकार बनवू शकणार नाही असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलंय. मागिल निवडणुकीत जरी आमची कामगिरी चांगली असली तरी बिहार,तामिळनाडू,गुजरात अशा राज्यात पाया भक्कमपण करण्याची गरज आहे असंही रमेश म्हणाले. तर काँग्रेस स्वबळावर कसं निवडून येऊ शकतं यावर चर्चा करण्यासाठीच चिंतन शिबिर आहे असं सांगत सलमान खुर्शीद यांनी सारवासारव केली आहे. या शिबिरात राहुल गांधींवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे त्यादृष्टीने आता काँग्रेसचे नेते मागणीही करु लागले आहे.

close