डिझेल साडेचार, सिलिंडर 100 रुपयांनी महागणार ?

January 11, 2013 12:50 PM0 commentsViews: 5

11 जानेवारी

रेल्वे प्रवासात दरवाढीनंतर डिझेल आणि घरगुती गॅसचे दर लवकरच वाढवण्याची शक्यता आहे. केळकर समितीच्या शिफारसींवर विचार सुरू असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी दिलीय. केळकर समितीनं इंधनाच्या किंमतीत मोठ्या सुधारणा सुचवल्या आहेत. डिझेल साडेचार रुपयांनी, तर घरगुती गॅस 100 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच एप्रिलपासून तोटा भरुन निघेपर्यंत 50 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. डिझेलची तीन ते चार रुपये दरवाढ एकदमच करण्याचा किंवा दरमहा एक किंवा दीड रुपये वाढीचा प्रस्ताव आहे. रॉकेलच्या दरातही दरमहा 35 पैसे किंवा दर तिमाहीला एक रुपया अशी दरवाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या वर्षीच्या दरवाढीचा निर्णय डिसेंबर 2012मध्येच घेतला आहे. चालू वर्षात पेट्रोलच्या दरात 10 रूपयांने दरवाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. पणही दरवाढ टप्प्याने होणार आहे.

close