रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए

January 23, 2013 10:40 AM0 commentsViews: 19

23 जानेवारी

जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येऊ शकते हे सिद्ध केलंय मुंबईच्या प्रेमा जयकुमार या तरुणीनं…प्रेमा जयकुमार हिने सीए (CA) परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय. प्रेमाचे वडील रिक्षा चालवतात तर आई गृहिणी आहे. आणि आपल्या कुटुंबासह मुंबईत साध्या चाळीमध्ये राहते. पण छोटसं घर तिच्या अभ्यासाच्या आड आलं नाही. भल्या भल्यांना जी परीक्षा नुसती पास करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात त्या परीक्षेत प्रेमा देशभरातून पहिली आली आहे. मालाडच्या एस बी खान चाळीत राहणारी प्रेमासोबतच तिचा भाऊही सीएची परीक्षा देत आहे. घरच्या परिस्थितीचं कोणतंही ओझं न बाळगता प्रेमानं मिळवलेलं हे उज्ज्वल यश तिच्यासारख्या अनेकींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

close