मंगेश पाडगावकरांना पद्मभूषण पुरस्कार

January 25, 2013 11:53 AM0 commentsViews: 61

25 जानेवारी

प्रतिष्ठीत पद्म पुरस्कांची आता थोड्याच वेळात घोषणा होणार आहे. कवी मंगेश पाडगावकर यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. वयाच्या 14 व्या वर्षापासून गेली 7 दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणार्‍या मंगेश पाडगावकर यांचा 'छोरी' हा कवितासंग्रह 1950 प्रसिद्ध झाला होता. जिप्सी, सलाम हे त्यानंतरचे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह तर मीरा आणि कबीर यांच्या काव्याचा भावानुवाद त्यांनी केला. तसंच 'बायबल'चा मराठी अनुवादही त्यांनी केला. आकाशवाणी रेडिओचे निर्माते म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. महाराष्ट्रातल्या काव्य रसिकांना कविता कशी जगावी याचा अनुभव मंगेश पाडगावकर आणि विं.दा.करंदीकरांनी कवितांच्या जाहीर मैफिली सादर करून दिला आणि याच कर्तृत्वाचा गौरव करत मंगेश पाडगावकरांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

close