नारायण राणेंचा गडकरींवर कौतुकाचा वर्षाव

January 16, 2013 10:55 AM0 commentsViews: 9

16 जानेवारी

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होतंय. नागपूरच्या बुटी बोरी एमआयडीसी भागात काम करणार्‍या कामगारांसाठी कमी दरात घर मिळण्यासाठी नितीन गडकरी यांच्या पुढाकारनं एक योजना तयार करण्यात आली होती. या योजनेच उद्धाटन आणि कामगरांना घराच्या वाटपसाठी नारायण राणे नागपुरात आले होते. यावेळी राणे यांनी गडकरींच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. काँग्रेसच्या नेत्यानं भाजपच्या अध्यक्षांचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या कार्यक्रमाला भाजचे सर्व महत्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते.

close