पाण्याअभावी राज्यावर भारनियमनाचं संकट

January 18, 2013 10:46 AM0 commentsViews: 4

19 जानेवारी

दुष्काळाच्या झळा असह्य झाले असतांना आता राज्यावर भारनियमनाचं संकट घोंघावत आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील विद्युत निर्मिती बंद पडू शकते. 1150 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेपैकी 450 मेगावॅट वीज निर्मिती बंद पडली आहे. सध्या सुरू असलेल्या तीन युनिटसला खडका बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला जातो. पण त्यातलंही पाणी संपल्यामुळे वीज निर्मिती बंद झाली आहे. त्याशिवाय मुदगल बंधार्‍यातून पाणी सोडण्यास शेतकर्‍यांचा विरोध असल्यानं यावर्षीच्या दुष्काळामुळे वीजनिर्मिती बंद पडण्याची शक्यता आहे. पाणी देण्याच्या वादावरून शेतकर्‍यांनी बंधार्‍यावरील ऑफिसची तोडफोड केल्याची घटनाही घडली आहे.

close