‘साहित्यिक राजकारणात येतात मग राजकारण्यांना विरोध का?’

January 11, 2013 2:29 PM0 commentsViews: 4

11 जानेवारी

आम्ही राजकारणी लोकांनी लेखणी हातात घ्यायची नाही. राजकारणी जर संमेलनात आले तर वाद होतो आणि जर साहित्यक राजकारणात आले तर आम्ही कधी वाद घालत नाही. पिण्याच्या पाण्यासारख उत्तम लिखान करणारे आचार्य अत्रे विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून आले विरोधीपक्ष नेते म्हणून उत्तम कामगिरी केली त्याचा आनंद थोडा आहे. अलीकडच्या काळात निसर्गावर, शेतीवर काव्य करणारे ना.धो महानोर राज्याच्या विधिमंडळामध्ये आले त्यांनाही कुठे विरोध केल्याचं नमुद नाहीय असं सांगत पवारांनी साहित्यकांचे चांगलेच कान उपटले. तसंच हमीद दलवाईंच्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्यास विरोध का होता हे मला कळले नाही. दलवाईंचे साहित्य क्षेत्रात योगदान मोलाचे आहे. त्यांचे योगदान हे आपण विसरू शकत नाही. पण त्यांच्या घरापासून दिंडी काढण्याचा अधिकार साहित्य समजणार्‍यांना नक्की असेल. त्याठिकाणाहून दिंडी निघणे अवशक्य होते. पण त्याला विरोध का केला हे मला समजू शकलं नाही असं सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ग्रंथदिंडीच्या वादावर खंत व्यक्त केली. 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते.

व्यवस्थेशी संघर्ष करत जे साहित्य उभं राहत तेच खरं साहित्य – नागनाथ कोत्तापल्ले

शरद पवार यांनी संमेनलनाशी निगडीत विविध वादांचा समाचार घेतला. तर संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी मात्र वादावर बोलणं टाळलं. व्यवस्थेशी संघर्ष करत जे साहित्य उभं राहत तेच खरं साहित्य असं प्रतिपादन नागनाथ कोत्तापल्ले यांनी केलं. तसंच राज्यात पडलेल्या दुष्काळपरिस्थितीवर दुख व्यक्त केलं. त्याचबरोबर कर्नाटक सरकार बेळगावमध्ये मराठी माणसांना दुय्यम दर्जाने वागवत आहे. कर्नाटकची प्रांतवार रचना होण्याआधी 500 वर्षांपेक्षा अधिक काळाहून लोकं तिथे राहत होती. मग बेळगावमध्ये मराठी भाषिक आताच गेले आहे का ? हे मराठी भाषिक 100 वर्षांपासून तेथे राहत आहे. मात्र कर्नाटक सरकार मराठी माणसाला पळवून लावत आहे. मराठी माणसं तिथं परदेशी नागरीकासारखे राहत आहे. हे अत्यंत निषेर्धाह आहे. कर्नाटक सरकारचा मी कडक शब्दात निषेध करतो. मराठी माणसं ही भारतीय नागरीक आहे हे कर्नाटक सरकारने लक्षात घ्यावे आणि केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करून हा तिढा सोडवावा अशी मागणीही कोत्तापल्ले यांनी केली.

close