उपमुख्यमंत्रीपदी छगन भुजबळ

December 5, 2008 6:32 AM0 commentsViews: 16

5 डिसेंबर, पुणेमहाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ही घोषणा केली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर छगन भुजबळ या पदांचे मुख्य दावेदार मानले जात होते. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणाला करायचं, यावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये मतभेद होते. त्यामुळे हा निर्णय अध्यक्ष शरद पवारांवर सोपवण्यात आला. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या या निर्णयानं काँग्रेसला पेचात टाकलं आहे. काँग्रेसनं नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केल्यानंतरच उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणं अपेक्षित होतं. मात्र काँग्रेसमध्ये गेले तीन दिवस मुख्यमंत्रीपदाचा घोळ कायम आहे. शुक्रवारी सकाळी सोनिया गांधी आणि ए. के. अ‍ॅन्टोनी यांच्या मीटिंगमध्येही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकला नाही. यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होतेय. त्या पार्श्वभूमीवर नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा लवकरात लवकर करण्यासाठी काँग्रेसवरील दबाव वाढला आहे.

close