‘राज ठाकरे शिवसेनेत येत असतील तर स्वागतच’

January 30, 2013 9:54 AM0 commentsViews: 17

30 जानेवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. एकत्र येण्याचा प्रश्न दोघांनाही एकत्र बसवून विचारा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेत यायला कोणी तयार असेल तर मी त्यांचं स्वागतच करेन इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी मनसेबाबत भूमिका मांडली. पण उद्धव ठाकरेंच्या या आवाहनला राज ठाकरे कसा प्रतिसाद देतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं हीच भाजपची इच्छा आहे. ते दोघं एकत्र आले तर भाजपला आनंदच होईल असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं.तशा शक्यतेमुळे शिवसैनिकांना आस लागली होती. पण राज ठाकरेंनी मुलाखतीवर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. आज सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं आवाहन

उद्धव-राज एकत्र येणार? टाळी एका हाताने वाजत नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडे मागू शकत नाही. त्यासाठी आम्हा 'दोघांना' एकत्र आणून समोरासमोर बसवा, बाजूबाजूला बसवा आणि मग हा प्रश्न विचारा. या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून आहे. कारण मी काहीही उत्तर दिलं आणि त्याच्या मनात नसेल तर ? पण कोणी मनापासून शिवसेनेसोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच करू -उद्धव ठाकरे

close