सुभाष तोमर मृत्यूप्रकरणी FIR विरोधात याचिका दाखल

January 4, 2013 5:43 PM0 commentsViews: 4

04 डिसेंबर

कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टानं दाखल करून घेतलीय. याप्रकरणी हायकोर्टाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावलीय. दिल्लीमध्ये बलात्कारविरोधी आंदोलनादरम्यान, कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 8 तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 2 तरुण घटनेच्यावेळी दिल्ली मेट्रो स्टेशनवर होते असं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालंय. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलिसांकडून स्टेटस रिपोर्टही मागवलाय.

close