राष्ट्रवादीच्या टार्गेटवर शिवसेना

January 7, 2013 5:31 PM0 commentsViews: 23

07 जानेवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 'पोरकी' झालेल्या शिवसेनेचा खालसा करण्याचा मनसुबा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाळगला आहे. 2014 च्या निवडणुकीत राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याची संधी राष्ट्रवादीला आहे. त्यादृष्टीनं शिवसेनेचे मतदार आणि मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केलीय. आज शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आल्याची माहिती मिळतेय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचं पुढे काय ? असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. पण कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचीच शिवसेना कशी राहिल याबद्दल अजून तरी कोणतीही तयारी केली नसल्याचं दिसतं आहे. याचाच फायदा घेण्याचं बहुतके शरद पवारांनी ठरवलंय. आतापर्यंत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस भारी पडेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना आता ती हळूहळू उघड होऊ लागली. आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आल्याची माहिती मिळतेय.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याची संधी राष्ट्रवादीला आहे. त्यादृष्टीनं शिवसेनेचे मतदार आणि मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली. सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव असल्यानं सेनेला आपला मतदार राखणं कठीण जाईल असं पवारांना वाटतंय. एकीकडे काँग्रेसच्या जागा कमी करायच्या आणि दुसरीकडे सेनेच्याही जागा बळकावण्यासाठी काय करावं लागेल सुचना पवारांनी केल्या. राज्यात 7 जागांवरून 25 जागांपर्यंत कशा पद्धतीनं मजल मारता येईल याची रणनीती पवारांनी आखलीय. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावाही घेण्यात आलाय. प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाचा लेखाजोखा शरद पवारांसमोर मांडलाय. बहुतेक मंत्री पक्ष वाढवण्याच्या कामात कमी पडतायत अशी शरद पवारांची तक्रार आहे. तसंच होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलासाठी चार मंत्र्यांना वगळायचे नावं निश्चित झाल्याची शक्यता आहे.

सिंचनाचं उट्टं SEZ वरून काढणार

- औद्योगिक धोरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुख्यमंत्री आणि काँग्रेसला घेरणार- औद्योगिक धोरणाचे इत्तिवृत्त अंतिम करतेवेळी काँग्रेसची कोंडी करणार- औद्योगिक धोरण केवळ उद्योगासाठीच हवे, राष्ट्रवादीची भूमिका- सिडकोच्या 12.5 टक्केच्या धर्तीवर IIZ मध्ये SEZच्या शेतकर्‍यांना 15 टक्के जमीन देण्याची मागणी राष्ट्रवादीचे मंत्री करणार

close