‘पाचवीच्या विद्यार्थ्यांना धड लिहिता, वाचताही येत नाही’

January 18, 2013 4:52 PM0 commentsViews: 7

18 जानेवारी

'आमची पोरं लई हुश्शार' असा ठेंभा मिरवणार्‍या पालकांना एक जबरदस्त धक्का बसला आहे. पाचवीतल्या मुलांना धड मराठीही वाचता येत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतील महाराष्ट्राचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालल्याचा धक्कादायक निष्कर्ष `प्रथम` या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या पाहणीत आढळून आलाय. या संस्थेनं `असर-2012' हा अहवाल मांडला आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या शांळांमध्ये हा सर्व्हे करण्यात आलाय. गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्याही मागे असल्याचं प्रथमच्या अहवालात म्हटलं आहे. दर्जा असाच घसरत राहिल्यास 2018 मध्ये 50 टक्के मुलं खासगी शाळांकडे वळतील असंही या अहवालातून समोर येतंय. राज्यातल्या जिल्हापरिषदांच्या 50 टक्के शाळांमध्ये जाऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे.

काय आहे वास्तव

- पाचवीच्या 41.7 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे धडे धडपणे वाचता आले नाहीत – तिसरीच्या 76 टक्के मुलांना वजाबाकीचं गणित सोडवता आलं नाही – पाचवीतील 79.08 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी वाक्य वाचता आले नाही – इंग्रजी वाक्य वाचता आलेल्या 21.02 टक्के विद्यार्थ्यांपैकी 41 टक्के विद्यार्थ्यांना वाक्यांचा अर्थ सांगता आला नाही – 2010 मध्ये तिसरीच्या 27.5 टक्के मुलांना पहिलीचा धडा वाचता येत नव्हता- 2012 मध्ये हे प्रमाण आणखी वाढून 40.5 टक्क्यांपर्यंत घसरले- 2012 मध्ये पाचवितल्या 37.8 टक्के मुलांना दुसरीचा धडा वाचता आला नाही 2010मध्ये हे प्रमाण 29 टक्के होते.

close