हर्षवर्धन जाधव आमदारकीचा राजीनामा मागे घेणार

January 10, 2013 10:31 AM0 commentsViews: 13

10 जानेवारी

मनसेमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे बाहेर पडत हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पण चोविस तासाच्या आत हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचे मतपरिवर्तन झाले आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आमदारकीचा राजीनामा देणं योग्य नाही असं अजित पवार यांनी जाधव यांना सल्ला दिलाय. त्यांचा सल्ला ऐकून जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय. याबद्दल खुद्द जाधव यांनी कबुली दिलीय. पण आमदारकी मागे घेतली असली तरी मनसेमध्ये परतणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जाधव यांनी बुधवारी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताच जाधव यांनी जखमेवरच्या खपल्या काढायला सुरूवात केली. राज ठाकरे यांच्या पीएनी उमेदवारीसाठी 5 लाख रूपये घेतले असा गंभीर आरोप जाधव यांनी केला. तसंच पक्षा मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार होतो असा खळबळजनक आरोपही केला.

close