‘बालक-पालक’चे तिकीट मिळवण्याच्या वादातून तरूणाचा खून

January 14, 2013 2:11 PM0 commentsViews: 87

14 जानेवारी

'बालक-पालक'(बीपी) या चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी लागलेल्या रांगेत शुल्क वादावरून अजय खामकर या तरूणाला आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईतील भारतमाता सिनेमागृहात दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. मागील आठवड्यात रिलीज झालेल्या बालक-पालक सिनेमा दुसर्‍याही आठवड्यात गर्दीत सुरू आहे. मुंबईतील मराठी चित्रपटांसाठी हक्काचे असलेल्या भारतमाता सिनेमागृहात दुपारी तीनच्या शोसाठी मोठी गर्दी झाली होती. या सिनेमाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत असलेल्या अजय खामकर (वय 19) आणि अशोक चव्हाण (वय 60) यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर हे प्रकरण हाणामारीवर गेले. चव्हाण याने रागाच्या भरात सिनेमागृहाबाहेर असलेल्या नारळपाणी विक्रेत्याचा कोयता घेऊन अजयच्या पोटात खुपसला. वार गंभीर वर्मी लागल्यामुळे अजय जागेवरच कोसळला. त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अजयवर वार करून चव्हाण पळून जात असताना वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

close