राजनाथ सिंग यांची भाजप नेत्यांना तंबी

February 4, 2013 11:20 AM0 commentsViews: 7

04 फेब्रुवारी

2014 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावरून भाजपच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य आता थांबवा, अशी तंबी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिली आहे. यानंतर कोणतीही सुचना करणार नाही असा इशाराही त्यांनी नेत्यांना दिला आहे. भाजप नेत्यांकडून मोदीचं समर्थन केलं जात होतं. त्याला जनता दल युनायटेडचा विरोध आहे. या सगळ्या वक्तव्यामुळे एनडीएत तणाव निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अध्यक्षांनी ही कडक भूमिका घेतली आहे.

close