आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन

February 1, 2013 10:19 AM0 commentsViews: 10

01 फेब्रुवारी

नंदुरबारमधल्या आदिवासी वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. पटेलवाडीतल्या आदिवासी विभागातल्या वसतीगृहातली ही घटना आहे. दिपक वसावे आणि राहुल वसावे या दोन विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकार्‍यांनी निलंबित केलंय. याविरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. मुलांनी गैरवर्तन केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. तर वसतीगृहातल्या गैरसोयींबद्दल आवाज उठवल्यानं विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. जोपर्यंत त्यांना पुन्हा वसतीगृहात घेण्यात येत नाही तोवर जेवण न घेण्याचा विद्यार्थ्याचा निर्धार आहे.

close