हिंदू संघटनांचा हात असलेल्या बॉम्बस्फोटांचा तपास NIAकडे

January 25, 2013 2:22 PM0 commentsViews: 13

25 जानेवारी

हिंदुत्ववादी संघटनांचा हात असलेल्या सर्व बॉम्बस्फोट प्रकरणांचा तपास राज्य सरकारनं आता नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयएकडे हस्तांतरीत केला आहे. या संबंधीची कार्यवाही पंधरा दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहीनिशी गृह खात्यानं पूर्ण केली. त्यानुसार, मालेगाव बॉम्बस्फोटांबरोबच आता नांदेड, परभणी, पूर्णा, जालना,वाशी आणि ठाण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांचादेखील तपास एनआयए करणार आहे. एनआयएच्या तपासात राज्याच्या एटीएसला सहकार्य करावे लागेल अशी माहिती गृह खात्याच्या सुत्रांनी दिलीय.

एनआयएकडे तपास

परभणी- नोव्हेंबर 2003पुर्णा – ऑगष्ट 2004 जालना- ऑगष्ट 2004 नांदेड- एप्रिल 2004मालेगाव-2006 आणि 2008 वाशी- जून 2008 ठाणे- जून 2008

close