ओवैसी यांची आंध्रांच्या कोर्टात रिट याचिका दाखल

January 7, 2013 5:45 PM0 commentsViews: 5

07 जानेवारी

द्वेषपूर्ण भाषण करणार्‍या एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी याच प्रकरणाच्या संदर्भात आंध्र प्रदेश हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. ओवैसी यांनी अटक टाळण्यासाठी आणि आणखी एफआयआर दाखल न करण्यासाठी रिट याचिका दाखल केलीय. या प्रकरणाची सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. यापूर्वी ओवैसी यांनी अदिलाबाद पोलिसांसमोर हजर होण्यासाठी 4 दिवसांची मुदत स्थानिक कोर्टाकडे मागितली होती. ओवेसी आज सकाळी लंडनहून भारतात आले. त्यावेळी ओवैसी यांच्या समर्थकांनी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत केलं. त्यानंतर संध्याकाळी पोलीस ओवैसी यांच्या घरी पोचले. आणि त्यांची चौकशी केली.

close