कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

February 6, 2013 10:26 AM0 commentsViews: 16

06 फेब्रुवारी

नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव क्विंटलमागे 800 रुपयांनी कोसळले आहेत. कुंभमेळ्याच्या नावानं रेल्वे वाहतूक खोळंबल्यानं कांद्याच्या मार्केटवर हा परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव तेवीसशे रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. त्यानंतर कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याची मागणी दिल्लीमधून केली जात होती. दरम्यान, यंदा कांद्याच्या लागवडीत 40 टक्क्यांनी घट झाली आहे. मनमाड, लासलगाव, चांदवड बाजार समित्यांमध्ये कांद्यांची घाऊक विक्री सरासरी चौदाशे रुपये क्विंटल म्हणजे चौदा रुपये किलो एवढे पडले. त्यात कालपासून रेल्वे प्रशासनाने कांद्यासाठी रॅकचं बुकिंग बंद केलं आहे. अलाहाबादच्या कुंभमेळ्यामुळे पुढले 10 दिवस रेल्वेमुळे होणारी कांद्याची वाहतूक बंद राहाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळत चालले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मात्र, ही वाहतूक 48 तासात सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

close