मुलाखतीसाठी गेलेल्या तरूणीचा विनयभंग

January 14, 2013 3:11 PM0 commentsViews: 108

14 जानेवारी

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अत्याचार रोखण्यासाठी कडक कायद्याची मागणी होतं आहे पण महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं रोज समोर येतं आहे. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली. शहरातील कॉग्निझंट कंपनीतील सहायक ऑपरेशन मॅनेजर संजय दूबे यांनी मुलाखतीकरिता आलेल्या आयटी इंजिनियर तरूणीचा विनयभंग केला. मुलाखत झाल्यानंतर संजय दूबेनी पीडित तरूणीला काही टिप्स देतो म्हणून कंपनीच्या लॉबीमध्ये थांबायला सांगितलं. काहीवेळानंतर संजय दूबे तिथं पोहचला आणि पीडित तरूणीचा विनयभंग केला. पीडित तरूणीच्या तक्रारी वरून चतु:श्रूंगी पोलीस स्टेशन मध्ये संजय दूबे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close