मुजफ्फर हुसेन विधान परिषदेवर

February 4, 2013 11:26 AM0 commentsViews: 9

04 फेब्रुवारी

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मुजफ्फर हुसेन यांची बिनविरोध निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा 7 फेब्रुवारीला होणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या मुदतीत अन्य कोणीही अर्ज दाखल झाला नाही. हुसेन दलवाई यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होणार होती. पण मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर विरोधकांनी या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. ही जागा अल्पसंख्यांक नेत्याला दिली जावी अशी मागणी काँग्रेसमधल्या एका गटाने केली होती. हुसेन हे ठाणे जिल्ह्यातले असल्याने कोकणातल्या अल्पसंख्याक समाजालाच ही जागा मिळाली आहे.

close