डिझेलच्या दरात दीड रुपया तर अनुदानित सिलिंडर 100 रू.वाढ?

January 10, 2013 10:51 AM0 commentsViews: 8

09 जानेवारी

रेल्वेची दरवाढीनंतर आता वाढत्या महागाईच्या आगीत आणखी तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने तयार केला आहे. अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरून नऊ करण्याचाही पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर तीने ते साडेचार रुपये, तर स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात 100 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने तयार केला आहे. स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच एप्रिलपासून तोटा भरुन निघेपर्यंत 50 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. डिझेलची तीन ते चार रुपये दरवाढ एकदमच करण्याचा किंवा दरमहा एक किंवा दीड रुपये वाढीचा प्रस्ताव आहे. रॉकेलच्या दरातही दरमहा 35 पैसे किंवा दर तिमाहीला एक रुपया अशी दरवाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या वर्षीच्या दरवाढीचा निर्णय डिसेंबर 2012मध्येच घेतला आहे. चालू वर्षात पेट्रोलच्या दरात 10 रूपयांने दरवाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. पणही दरवाढ टप्प्याने होणार आहे.

close