सोनई हत्याकांड प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

February 1, 2013 10:22 AM0 commentsViews: 87

01 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई इथल्या दलित हत्याकांडप्रकरणी धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणाच्या पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची माहिती पोलीस दलातील काही वरीष्ठ सूत्रांनी दिली आहे. गुन्ह्याचे पंचनामे जाणीवपूर्वक कमकुवत ठेवण्यात आलेत तसंच गुन्ह्याची कलमंसुद्धा कमजोर लावण्यात आली आहेत, अशी माहितीही आता उघड होतेय. त्यामुळे नगर जिल्ह्याबाहेरच्या आयपीएस अधिकार्‍याकडून या गुन्ह्याच्या फेरतपासाची गरज निर्माण झाली आहे. तसंच पोलिसांवर राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख आणि त्यांचे भाऊ प्रशांत गडाख यांचा दबाव असल्याची माहितीही पुढे येत आहे.

पोलीस तपासावर नेमके काय प्रश्न उपस्थित ?

- पंचनामे जाणीवपूर्वक कमकुवत- ऍट्रासिटी गुन्ह्याची कमजोर कलमे – कट रचून हत्या करण्याचं कलम 120 ब लावलं नाही- पोलिसांच्या तपासात राजकीय हस्तक्षेप- राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख आणि भाऊ प्रशांत गडाख यांचा पोलिसांवर दबाव- सोनाईचे एपीआय विलास पाटील हे गडाख यांच्या विशेष मर्जीतले – शेवगाव जवळील श्रीरामपूर उपविभागाचे उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे तपासाची सूत्र – सोनाई शेवगाव उपविभागात असताना गांगुर्डे यांच्याकडे तपास का ?

close