रत्नागिरी मच्छीमार सोसायटीने बुडवला 3 कोटींचा महसूल

January 30, 2013 10:23 AM0 commentsViews: 26

30 जानेवारी

रत्नागिरी मच्छीमार सोसायटीने मच्छीमारांसाठी मिळाणार्‍या लाखो लिटर डिझेलची बोगस विक्री करून 3 कोटीहून जास्त रकमेचा भ्रष्टाचार केल्याचं मत्स्य सहकारी संस्थाबाबत होणार्‍या विशेष लेखापरीक्षणात आढळून आलंय. हा लेखापरीक्षणाचा अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागला असून सोसायटीच्या दोषी संचालकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणातल्या तक्रारदाराने केलीय. हा संपूर्ण भ्रष्टाचार हा 2000 ते 2005 या कालावधीत झाला असून या कालावधीत तब्बल 42 लाख 62 हजार 645 लीटर डिझेलची बोगस विक्री करून संचालकांनी शासनाचा 3 कोटी 46 लाखाहून जास्त रकमेचा महसूल बुडवल्याचं तपासणीत आढळून आलंय. याबाबत प्राथमिक तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित संचालकांवर गुन्हे दाखल केले असले तरी त्यांच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही. तसंच सहकारी संस्थांच्या तत्कालीन निबंधकांनी याबाबत का कारवाई केली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.

close