बलात्कार पीडित मुलीला पोलिसांनीच केली मारहाण

February 8, 2013 11:36 AM0 commentsViews: 12

08 फेब्रुवारी

तीन नराधमांच्या तावडीतून आपली अब्रु वाचवून संरक्षण मागायला गेलेली बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनीच मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. अहमदनगरमध्ये राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचे तिघांनी अपहरण करून तिला पुण्याला नेलं आणि तिथे तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यावर तिनं आपल्या आईवडिलांशी संपर्क साधला. तेव्हा अहमदनगर पोलिसांच्या सूचनेनुसार पुण्यातल्या दत्तवाडी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. मुलीने आपल्यासोबत घडलेली कर्मकहाणी पोलिसांना सांगितली. पण गुन्हा नोंदवण्याचं सोडून पोलिसांनी तिलाच मारहाण केली आणि आपण स्वत:च मुलांबरोबर पळून आलोय, असं लिहून घेतल्याचा आरोप या मुलीने केला आहे. अहमदनगरला आल्यावर तिने आपल्या कुटुंबीयांनी हकीकत सांगितल्यावर नगरच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दोघं अजून फरार आहेत. तर पुणे पोलिसांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

close