भारत-इंग्लंड उद्या आमने-सामने

January 14, 2013 4:02 PM0 commentsViews: 23

14 जानेवारी

भारत आणि इंग्लंडदरम्यानची दुसरी वन डे उद्या कोचीमध्ये खेळवली जाणार आहे. राजकोट वन डे जिंकत इंग्लंडनं सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहेत. त्यामुळे सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी भारताला ही वन डे जिंकावी लागणार आहे.

कॅप्टनकुल धोणी मैदानावरील या आकंडतांडवानंतरही भारताचा आणखी एक पराभव मात्र तो टाळू शकला नाही राजकोट वन डेत इंग्लंडनं ठेवलेल्या 326 रन्सच्या विजयी लक्षाचा पाठलाग करताना भारताला 9 रन्सनं पराभव पत्कारावा लागला. 50 ओव्हरच्या या चॅम्पियन टीमला सध्या विजयासाठी झगडावं लागतंय.

राजकोटच्या पाटा पीचवर इंग्लंडच्या बॅट्समननं खोर्‍यानं रन्स केले. आणि याला कारणीभूत ठरले ते भारतीय कॅप्टननं घेतलेले काही आश्चर्यकारक निर्णय. सुरेश रैना आणि रविंद्र जडेजानं आपल्या स्पीननं रन्सला लगाम घातला. पण त्यांना थांबवत धोणीनं ईशात शर्मा आणि आर अश्विनच्या हाती बॉल दिला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 44 रन्सची खैरात केली.

रैनानं 5 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत अवघ्या 18 रन्स दिल्या होत्या. युवराज सिंगला तर बॉलिंग करण्याची संधीच मिळाली नाही. इतकंच काय तर 21 रन्समध्ये 2 विकेट घेणार्‍या अशोक दिंडालाही त्याचा 10 ओव्हर्सचा कोटा पूर्ण करु दिला नाही. 42, 44 आणि 46 व्या ओव्हर्समध्ये दिंडानं तब्बल 9 डॉट बॉल टाकले. पण दिंडाऐवजी सुमार बॉलिंग करणार्‍या ईशांत शर्मा आणि भुवनेश्‍वर कुमारनं शेवटच्या ओव्हर्स टाकल्या.

पण पराभवाचं खापर एकट्या कॅप्टनवर फोडता येणार नाही. 11 ओव्हरमध्ये 69 रन्स अशा चांगल्या सुरुवातीनंतरही पुढच्या 9 रन्समध्ये दोन्ही ओपनर्स पॅव्हेलिअनमध्ये परतले. तर टॉपचे चार बॅट्समन अवघ्या 40 रन्समध्ये आऊट झाले. सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला विराट कोहलीला या मॅचमध्ये सुर गवसला नाही.

आता जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी भारताला गरज आहे काही प्रेरणादायी विजयाची.. कोची वन डे जिंकत भारतीय टीम याची सुरुवात करेल अशी आशा करुया..

close