नयना पुजारीच्या मारेकर्‍याला पकडण्यासाठी SITची स्थापना

January 11, 2013 4:10 PM0 commentsViews: 25

11 जानेवारी

पुण्यातील नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणातील फरार आरोपी योगेश राऊत याला पकडण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भांबरे यांनी ही माहिती दिलीये. पुण्यामध्ये 2009 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आठच दिवसांमध्ये पुणे पोलिसांनी प्रमुख आरोपी योगेश राऊत याला अटक केली होती. पण त्यानतंर सप्टेंबर 2011 मध्ये तब्येत ठीक नसल्याचं कारण देत योगेश राउत ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आणि तिथूनच फरार झाला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष झालं तरी त्याला पोलीस पकडू शकले नाहीत. दोन दिवसांपूर्वीच याबाबत संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून आरोपीला पकडण्याची मागणी केली होती.

close