मुंबई पालिकेचं 28 हजार कोटींचं बजेट सादर

February 4, 2013 11:34 AM0 commentsViews: 3

04 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेचं साडेसत्तावीस हजार कोटींचं बजेट आयुक्त सीताराम कुंटे यांनी सादर केलं आहे. 1 कोटी 39 लाखांचं शिलकीचा अर्थसंकल्प आहे. बजेट सादर करताना विरोधकांनी हरकती घेतल्या. गेल्या वर्षीचं बजेट अजून वापरलं गेलं नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर बजेट सादर झाल्यानंतर चर्चा करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे. जकात संकलनामध्ये झालेल्या सुधारणेमुळे 2012-13 या आर्थिक वर्षात 7 हजार 125 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. फिजिबल एफएसआयच्या नव्या संकल्पनेमुळे जानेवारी 2013 पर्यंत 943 कोटी जमा झाले आहेत. तर चालू वर्षात 1150 कोटी अपेक्षित आहेत. राज्य सरकारच्या निर्देशामुळे जकातऐवजी स्थानिक संस्था कर लागू करणार आहेत.

close