मुलुंड झोपडपट्टी जाळपोळ प्रकरणी 7 जणांना अटक

January 21, 2013 12:11 PM0 commentsViews: 22

21 जानेवारी

मुलुंडमधील अनधिकृत झोपडपट्टी जाळल्या प्रकरणी जवळपास 175 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दंगल,जाळपोळ ,मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे लावण्यात आले आहेत. 25 जणांची ओळख पटली असून त्यातील 7 जणांना पोलिसांनी अटक केलीय. यात प्रामुख्याने सेनेचे माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे,भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधर यांचा सहभाग आहे. सोमवारी मनसेचे आमदार शिशिर शिंदे, भाजपचे आमदार सरदार तारासिंग,भाजपचे नगरसेवक मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नंदकुमार वैती यांना अटक होण्याची शक्यता आहे.

close