‘विश्वरुपम’रिलीज झाला नाही तर देश सोडेन -कमल हसन

January 30, 2013 10:28 AM0 commentsViews: 4

30 जानेवारी

'विश्वरूपम' सिनेमावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून कमल हसन प्रचंड नाराज झाला आहे. मला न्याय मिळाला नाही तर ज्या प्रमाणे एम.एफ.हुसेन यांनी देश सोडला तसाच मीही सोडेन असा इशारा कमल हसनने दिलाय. विश्वरुपम या कमल हसन यांच्या चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारनं चित्रपटावर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात कमल हसनने कोर्टात धाव घेतली. आज या प्रकरणावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याअगोदर कमल हसनने मीडियाकडे आपली भूमिका मांडली.

close