राष्ट्रवादींच्या आमदारांचा पक्षाला घरचा अहेर

January 23, 2013 3:46 PM0 commentsViews: 22

23 जानेवारी

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन सहयोगी आमदारांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम प्रश्नावर सरकारनं सात दिवसांत तोडगा काढावा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप, विलास लांडे यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचा धडाका लावला आहे. यामुळं या भागातील बांधकाम व्यावसायिकांना फटका बसलाय. पण या कारवाईमुळं सर्वसामान्यांना बेघर व्हावं लागतंय असं राष्ट्रवादीच्या दोन सहयोगी आमदारांचं म्हणणं आहे. सरकारनं याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा नाहीतर सरकारला धारेवर धरू असा इशारा भोसरीचे आमदार विलास लांडे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलाय. पण ही कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार होत असल्याचं आयुक्त श्रीकर परदेशी यांनी स्पष्ट केलंय.

close