हेलिकॉप्टर खरेदी रद्द करण्याबाबत सरकारमध्ये मतभेद

February 18, 2013 9:36 AM0 commentsViews: 15

18 फेब्रुवारी

वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारवरून सरकारमध्येच मतभेत झाले आहेत. हा वादग्रस्त व्यवहार रद्द करावा यासाठी संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांच्या प्रस्तावावर पंतप्रधान कार्यालय नाराज असल्याचं कळतंय. माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाल्यामुळे हा व्यवहार रद्द करावा असं अँटनी यांचं म्हणण आहे. दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्या प्रकरणी सीबीआयची टीम आता इटलीला जाणार आहे. लाचेची रक्कम काही कंपन्या भारतात स्थापन करून त्यांच्यामार्फत वळवण्यात आली का याची चौकशी ही टीम करणार आहे. इटलीच्या चौकशी अहवालात भारताचे माजी एअर चीफ मार्शल एस. पी.त्यागी यांच्या तीन चुलत भावांना या घोटाळ्यात लाच मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

close