शिवसेना सोडणार नाही -संजय पवार

January 16, 2013 1:59 PM0 commentsViews: 79

16 जानेवारी

कोल्हापूरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या अंतर्गत राड्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसेना सोडणार नसल्याचं जाहीर करत गटबाजीबाबत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. जिल्ह्यात शिवसेनेतल्या 2 नेत्यांच्या गटबाजीमध्ये सध्या सामान्य शिवसैनिक भरडला जातोय. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या धुमसत असलेला वाद संक्रांतीदिवशी समोर आला. पवार यांनी थेट शिवसेनेचे संपर्कनेते दिवाकर रावते यांच्याच कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. दरम्यान, आमदार क्षीरसागर यांनीही पत्रकार परिषद घेऊन पवार यांना शिवसेनेतून काढून टाकावे अशी मागणी केली होती. तसंच येत्या 12 फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्यानं पवार हे मनसेत जाणार का याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू होती. मात्र पवार यांनी शिवसेना सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र आमदार आणि पवार यांच्यातला वाद कधी मिटणार असा प्रश्न सामान्य शिवसैनिकाला पडलाय.

close