बाळासाहेबांच्या मृत्यूची नोंद केली जन्म नोंदणी रजिस्टरमध्ये

February 8, 2013 11:54 AM0 commentsViews: 18

08 फेब्रुवारी

देशाची आर्थिक राजधानी मुंबई…या मुंबईच्या महापालिकेवर गेली 17 वर्ष शिवसेनेची सत्ता…पण ज्या शिवसेनेला ज्यांनी जन्म दिला त्यांच्याच मृत्यूची नोंद जन्म नोंदणी रजिस्टर केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युची नोंद जन्माची नोंद असलेल्या रजिस्टरमध्येच करण्यात आली आहे. मृत्युच्या नोंदणीसाठी असलेल्या वह्या संपल्यामुळे जन्मवहितच ही नोंद झाली. सर्वसामान्यांना महापालिकेच्या गलथानपणाचा फटका अनेकवेळा बसत असतो. जन्मजात अर्भकाचे नाव ज्या वहित नोंदले जाते त्याच वहित बाळासाहेबांच्या मृत्युची नोंद केली गेली आहे त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या बाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो असे उत्तर जन्म मृत्यू विभागातून देण्यात येतंय. आता याप्रकरणामुळे खडबडून जागे झालेले महापौर सुनील प्रभूंनी घडलेला प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

close