शिवसेनेच्या इशार्‍यापुढे पोलीस नमले, पुष्पा भावेंना कार्यक्रमातून वगळलं

January 8, 2013 11:22 AM0 commentsViews: 5

08 जानेवारी

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना शिवसेनेनं दिलेल्या चिपळूण बंदीच्या इशार्‍यापुढे पोलिसही नमलेत. दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महिलांवरील अत्याचार आणि समस्या या बद्दल, चिपळूणमध्ये एक कार्यक्रम आज आयोजित केलाय. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुष्पा भावे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेच्या या इशार्‍याला बळी पडून पोलिसांनीच पुष्पा भावेंना कार्यक्रमातून वगळलंय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कारण देत पुष्पा भावेंचं नाव वगळल्याचं स्पष्टीकरण पोलीस देत आहे. त्यातच गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही पोलिसांची पाठराखण केलीये. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे असा खुलासा आर.आर.पाटलांनी केला. त्याचबरोबर पुष्पा भावेंचं नाव का वगळलं, यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल मागवला असल्याचंही आर.आर.पाटलांनी सांगितलंय.

close