पाक खेळाडूंना घरचा रस्ता ?

January 15, 2013 9:57 AM0 commentsViews: 11

15 जानेवारी

पाकिस्तानाने काढलेली कुरापत आता त्यांनाच महागात पडणार आहे. मुंबईत हॉकी लीगसाठी सहभागी झालेल्या पाक खेळाडूंना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंना हॉकी इंडिया लीगमध्ये घेतल्या कारणावरुन ही स्पर्धा वादात सापडली आहे. हॉकी लीगच्या मुंबई मॅजिशियन्स टीममध्ये सहभागी झालेले पाकिस्तानचे चार खेळाडू मायदेशी परतणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबत पाक हॉकी असोसिएशनलाही कळवण्यात आलंय.दरम्यान, हॉकी इंडियानं दिल्ली आणि पंजाब टीमला पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू न निवडण्याबद्दल विनंती केली होती. हॉकी इंडिया लीगमध्ये एकूण 9 पाकिस्तानी खेळाडू खेळत आहेत. तर महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या मॅच या मुंबईबाहेर हलवण्याची विनंती करणारं पत्र आता बीसीसीआयनं आयसीसीला लिहीलंय. पाकिस्तानी टीमला शिवसेनेनं विरोध केल्यानंतर बीसीसीआयनं आयसीसीला ही विनंती केली आहे. महिला वर्ल्ड कप 31 जानेवारीपासून मुंबईमध्ये 4 ठिकाणी खेळवण्यात येणार आहे.

close