जनतेला पाणी पिण्यासाठी, राजकारण्यांना उद्योगासाठी !

January 18, 2013 12:35 PM0 commentsViews: 14

18 जानेवारी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जुलैपर्यंत धरणांतील पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. पण सरकारच्या या निर्णयाला राजकारणी मंडळीच हरताळ फासत असल्याचं उघड झालंय. सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलंय. या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. या परिसरातील शेतकर्‍यांनी या पाण्याचा वापर शेतीसाठी करू नये, यासाठी वीज कनेक्शन बंद करण्यात आली. पण राजकारण्यांच्या उद्योग धंद्यांना हे पाणी वापरलं जात असल्याची बाब उघडकीस आली. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर साखर कारखान्यानं जनरेटर लावून तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्या विठ्ठल साखर कारखान्यांनी वीज कनेक्शननं पाणी उपसा सुरू केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी एक न्याय आणि राजकारण्यांसाठी वेगळा न्याय का असा सवाल शेतकरी करत आहे.

close